Skip to main content

Godavari Foundation – गोदावरी फाऊंडेशन

गोदावरी अर्बनच्या मुख्य शाखेच्या १३ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित उद्यमी ग्लोबलचे ‘उद्योगिनी संवाद अभियान’ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.

यावेळी गोदावरी फाऊंडेशनच्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण करण्यात आले. तसेच उद्यमी ग्लोबल फाऊंडेशनच्या महिला सदस्यांना ओळखपत्र (आय-कार्ड) वितरित करण्यात आले. यासोबतच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रणिता धुमाळ, कविता खांडे, शिवकन्या टाले, राजश्री पाथरकर आणि रंजिता पांपटवार या यशस्वी उद्योजिकांचा विशेष सन्मान करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाला आमदार हेमंत पाटील प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच व्हॉइस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे, नैन्सन सोल्यूशन्स च्या संस्थापिका सुमलता राव इ. online स्वरुपात तर गोदावरी अर्बनचे व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर, सचिव रविंद्र रगटे, संचालक प्रा. सुरेश कटकमवार, साहेबराव मामिलवाड, वर्षा देशमुख, कमलताई पाटील, नगरसेविका मीनल पाटील, उपसरव्यवस्थापक सुरेखा दवे, ए.आर.के. उद्योग समूहाचे अध्यक्ष रितेश जुजाराव, उद्यमीच्या संचालक कीर्ती तगडपलेवार, निता कटकमवार, रेवती रगटे, विजया बोरसे, अरुणा पुंड आणि प्रतिक्षा पतंगे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.

याप्रसंगी मुख्यालय, मुख्य शाखा, सिडको, चिखलवाडी, वसमत, अर्धापूर आणि आ. बाळापूर शाखांतील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वर्धापन दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमातून महिला उद्योजकतेला प्रोत्साहन, सामाजिक बांधिलकी आणि संस्थेच्या प्रगतीचा गौरव अशा विविध पैलूंना उजाळा मिळाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *